आदित्यजी- बाळासाहेबांबद्दल

आदित्यजी- बाळासाहेबांबद्दल

युवासेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात क्रांतिकारक बदल घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून कार्य हाती घेतलेल्या आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांचे आजोबा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रचंड प्रभाव आहे. आदित्य ठाकरे हे युवकांमध्ये मिसळतात, त्यांच्याशी थेट संवाद साधतात. आदित्यजींचा हा गुण सर्वांना भावतो. काळाप्रमाणे प्रत्येकाने बदलले पाहिजे, वाद नको, संवाद हवा, ही त्यांची भावना आहे. असे हे आदित्यजी स्वतः कविमनाचे आहेत. त्यांनी स्वतः काही कविताही केलेल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांना ते लाडाने ‘आजा’ असे म्हणत. शिवसेनाप्रमुख आणि आदित्यजी यांच्यातील हे भावनिक नाते त्यांच्या कवितेतून व्यक्त झालेले आहे.
आदित्यजी म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाहीत, मात्र ते प्रत्येक शिवसैनिकामध्ये आहेत. शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केला. शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नातूनच मुंबईमध्ये ५५ उड्डाण पुलांची निर्मिती झाली. सी-लिंक आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे या बाळासाहेबांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे स्वप्न साकारलेले आहे. कोणतेही महत्त्वाचे शासकीय पद न भूषवताही त्यांनी आपली ताकद, शक्ती निर्माण केली. शिवसेनाप्रमुख हेच एकमेव पद त्यांनी भूषवले आणि त्याच्या जोरावर असंख्य समाजोपयोगी कामे केली.
ते माझे आजोबा होते, होय, माझ्यासाठी ते आजोबाच होते. त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक माणसाकरिता, मग तो सामान्य असो अथवा कोणीही स्टार, ते एक गोष्टच बनत असत. एकदा त्यांनी शब्द दिला की दिला. त्यांच्यासाठी प्रार्थना केलेल्या प्रत्येकाचा मी शब्दशः ऋणी आहे. लाखो-करोडो लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. खूप काही बोलायचे असले तरी शब्द पुरेसे नाहीत, असा होता माझा ‘आजा’.
तुझी आठवण…
सागर आठवणींचा साठतो
प्रत्येक आठवण तुझी,
त्या सागरास मिळते
खोल किती, न जाणे
अथांग पसरलेल्या
एक एक क्षणात असलेल्या आठवणी
त्याच सागरावर माझे जीवन तरंगते
कधी लाटा, कधी स्थिर असे
भेटावंसं मन करीत
आशीर्वाद जाणवतो तुझा
तुझ्या आठवणींचा श्रीमंत मी
पण तुझ्या स्पर्शाचा फकीर असे…
————–
आदित्यजींच्या काव्यातून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब
जागविला तुम्हीच हो हिंदू धर्म,
हिंदू नाव, गाव माझे,
हिंदू माझे कर्म॥
लढे लढलात ऐसे तो हजार,
फडकविला पुन्हा बुलंद ध्वज भगवा,
हर सामना, हर दिशा, हर नव्या अटकेपार॥
दिशा नवी, आवाज दिला सामान्यांस,
प्रेम म्हणा डोळ्यात, तेज म्हणा,
बसलात मित्र-शत्रूंच्या हृदयात॥
अवतार तुम्ही, ज्वलंत अग्नी जसे,
सूर्य तेज, चंद्र माया,
भुक्याची चुल, दृष्टांना जळण्यास वणवा असे॥
कोण समजले रे कधी तुला,
एवढे रूप, रंग, एवढा प्रकाश तुझा,
आमच्या भल्यासाठी प्रेमळ क्रोध, तुमची अपार माया॥
नव्या युगातला देव आमुचा,
शक्ती हातात, भक्ती मनात,
तूच रे असे जीव प्राण आमुचा॥
तूच रे पंढरी आमुची,
युगपुरुष, शक्ती देण्यास सैनिकांचा बाप असे,
प्रेमळ स्पर्श देण्यास सेवकांची तू माय॥
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी