१९ जून १९६६

१९ जून १९६६

मार्मिक’मधून मुंबईतील आस्थापनांतील नोकरवर्गाच्या याद्या छापून येत होत्या त्या परप्रांतीयांच्या होत्या. मराठी माणसास स्थान नव्हते. लायकी असून त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. मुंबईतील सरकारी-निमसरकारी व प्रायव्हेट कंपन्यांमध्ये दाक्षिणात्यांचा भरणा जास्त होता. मराठी माणूस शोधून सापडत नव्हता. `मार्मिक’मधील आपल्या लिखाणाने बाळासाहेबांनी मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले. अनेक मराठी माणसे `मार्मिक’च्या कार्यालयात येऊन आपल्या व्यथा आणि वेदना मांडायचे. ही मराठी माणसांची गर्दी पाहून दादा म्हणाले, हे एवढे लोक येतात, याला काही ऑर्गनाईज्ड स्वरूप द्यायचं की नाही? या सगळ्या गोष्टीला, चळवळीला संघटनेचा आकार द्या. तरच त्यातून काहीतरी ठोस घडेल. नाहीतर ही जागृती फुकट जाईल. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी प्राणपणाने झुंजणारी संघटना काढणं हा एकच मार्ग त्यावर आहे. संघटना काढायची! दादा म्हणाले, कधी?
बाळासाहेब म्हणाले, आता. नारळ आणून छत्रपतींच्या पुतळ्यासमोर सहदेव नाईकने तो फोडला. बाळासाहेब म्हणाले, नाव काय ठेवायचे?
दादा म्हणाले, त्यात विचार कसला करता?
शिवसेना.
तो दिवस होता १९ जून १९६६.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी `शिवसेना’ स्थापन झाली.
१९ जून १९६६ रोजी सकाळी ९.१५ वाजता शिवछत्रपतींच्या जयजयकारात शिवसेनेची नोंदणी सुरू झाली. श्री. सहदेव नाईक यांनी जयजयकार करून नारळ फोडला व प्रबोधनकारांच्या हस्ते शिवसेनेचे तक्ते देण्यास सुरुवात झाली. एकदा तासात दोन हजार तक्ते संपले. दोन दिवसांत दहा हजारांच्यावर नोंदणी झाली. २६ जूनच्या `मार्मिक’मध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा `वाघ’ छापण्यात आला. सोबत शिवराय होतेच. मागच्या बाजूला महाराष्ट्राचे चित्र आणि `मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे वचन लिहिले होते आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसाच्या या संघटनेचे नाव छापले होते – `शिवसेना’!
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी