असे होते दादा – प्रबोधनकार ठाकरे

असे होते दादा – प्रबोधनकार ठाकरे

दादा काय होते, कसे होते, हे एकाच वेळी सांगणं कठीण आहे. ते कडवट होते. कसे कडवट होते? माझ्या लहानपणी आम्ही पुण्यात राहत होतो. दादांची डेक्कन स्पार्क कंपनी होती. त्यांनी दादांचं `खरा ब्राह्मण’ नाटक काढलं. संत एकनाथांवर. त्यात संत एकनाथ गाढवाला पाणी पाजतात. अस्पृश्याच्या मुलाला कडेवर घेतात याचे उल्लेख आहेत. भटं खवळली. मग नाटकाची होळी काय केली. बोंबा काय मारल्या, शेणमार काय केला, प्रेतयात्रासुद्धा काढली होती. शेवटी मेलेलं गाढव आणून टाकलं दारात. तर ते दादा ओढून नेत होते. भोपटकर (बहुधा `भाला’कार) शेजारी राहत होते. त्यांनी वरून विचारलं, `काय ठाकरे, काय चाललंय?’ तर दादा म्हणाले, `तुमच्या बापाला ओढून ओंकारेश्वरावर नेतोय.’ असला कडवटपणा. पुष्कळदा मी त्यांना म्हणायचो, `दादा, हे कशाला करता तुम्ही?’तर म्हणायचे, `नाही, या साऱ्यांना असं घेतलंच पाहिजे. यांना आडवं केलंच पाहिजे.’अन्यायाला लाथ हे त्यांचे ब्रीदवाक्य. अन्याय सहन करायचा नाही. लोकांना शिकवायचे `तुम्ही सहन करू नका.’
आता असा प्रश्न येतो की, खरोखरच ते हिंदुत्वाच्या विरोधात होते काय? हिंदू धर्माच्या विरोधात होते काय? बिलकूल विरोधात नव्हते. पण त्यात जे वाईट चाललेलं आहे त्याच्या जरूर विरोधात होते.
आगरकरसुद्धा ब्राह्मण होते. त्यांच्या विचाराचे जे प्रबोधन होते त्याला विरोध करणारेही पुण्यातले खडूस ब्राह्मणच होते. दादा त्यांना बामण, भट भिक्षुक म्हणत. ब्राह्मण-बामण, ब्राह्मण-भटभिक्षुक यातला फरक लक्षात घ्या.
आम्ही कधी जात विचारीत नाही. जातीची मला गरज नाही. महाराष्ट्रात मराठी, हिंदुस्थानात हिंदू याखेरीज आम्हाला जात नाही. खोलातच जायचं तर गरीब आणि श्रीमंत याखेरीज तिसरी जात मी मानीत नाही.
आम्हाला धर्मावर प्रहार करायचे नाहीयेत. पण धर्माचे अर्थ समजून घ्या. धर्माची व्याख्या व्यापक आहे. गाडगेबाबांच्या म्हणण्यानुसार तहानलेल्यांना पाणी, भुकेल्याला अन्न, नग्न असेल त्याला वस्त्र हाच धर्म असू शकतो. म्हणून दादांनी `देवळांचा धर्म` या विषयावर जे संशोधन केलयं ते वाचा. आपण किती फसवले, नागवले जातो याचं ज्ञान होतं.
या छोट्या पुस्तिकेत दादांच्या विचारांच्या काही ठिणग्या दिसू शकतात. खरी आग, खऱ्या ज्वालांचे दर्शन दादांच्या `जीवनगाथा` आणि इतर ग्रंथांमधूनच घेतले पाहिजे.
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी