शिवसेनागीत

शिवसेनागीत

जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना…आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करू जिवाचे रान…
पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदूस्थान।
आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान।
भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा…२
जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥
वरदान दिले शौर्याचे आई भवानेने आम्हास
खड्ग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास
लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास।
महाराष्ट्र धर्म वाढवा… सांगतो शिवबांचा इतिहास॥
बस पुरे आता ना होऊनी देऊ माणुसकीची दैना,
जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥
धगधगता अग्नी चहूकडे अन मार्ग निखार्यांचा
जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा
अरे हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा ‘भेकडांचा’
वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा’
घडवून दावू आम्ही जे कोणास कधी जमले ना
जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥
कायापालट कोणाचा या आम्ही करूनी दावू
मराठवाडया हिरवा शालू आम्ही नेसवून दावू
लचके तोडून पश्चिम घाटा ज्यांनी ही निंदिले
धूळ चारूनी त्यांना पून्हा सोने पिकवूनी दावू
विदर्भ आमुची शान असे अन मान असे आमुची
कशी छाटुनी देऊ? आम्ही प्राण पणाला लावू!
‘जळगाव’ असे हो आमुचे जितके ‘बेळगाव’ ही तितके
एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ
आठवा ‘बॉम्बे’चे या ‘मुंबई’ आम्हीच हो केले ना?
जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी