शिवबंधन

शिवबंधन

”शिवबंधन हा गंडादोरा नाही, हा धागा आहे शिवसेना आणि शिवसैनिकांचे असलेले अतूट नाते अधिक दृढ करण्यासाठी!”तुळजापुरातील भवानीमातेच्या मंदिरात २० जानेवारी २०१४ रोजी प्रचंड जल्लोषात व मंत्रोच्चारात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते सुभाष देसाई व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पवित्र ‘शिवबंधन’ धाग्याचे विधिवत पूजन केले.
शिवसैनिकांना देण्यात येणारा हा पवित्र धागा आज तुळजाभवानीच्या चरणी वाहण्यात आला. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आई तुळजाभवानीची षोडशोपचारे पूजा केली. देवीची खणानारळाने ओटी भरली. त्यानंतर ‘शिवबंधन’ धाग्याचे मंत्रोच्चाराच्या गजरात पूजन करण्यात आले आणि तमाम शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘आई राजा उदे उदे’चा गजर करून तुळजाभवानीकडे बळ मागितले. पारंपरिक गोंधळपूजा झाल्यानंतर शिवसैनिकांनी बेलभंडार उधळला आणि मंदिर परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या महागजराने दणाणून गेला. विधिवत पूजा आटोपल्यानंतर ठाकरे घराण्याचे पारंपरिक पुजारी कुमार इंगळे यांनी कवड्यांची माळ घालून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना ‘विजयोस्तु’ असा आशीर्वाद दिला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली प्रतिज्ञा…
”मी माझ्या कुलदैवताला आणि छत्रपती शिवरायाला स्मरून शपथ घेतो की,
मी माझ्या शिवसेना या संघटनेशी
आजन्म इमान राखीन.
पद असो वा नसो,
मी एक एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून
शिवसेनेशी कधीही गद्दारी वा
बेइमानी करणार नाही.
शिवसेनाप्रमुखांचे आदेश
मी एका कडवट निष्ठेने पाळीन.
त्याचबरोबर येत्या निवडणुकीत
शिवसेनेचे भगवा फडकवण्याचे
जे स्वप्न आहे ते निष्ठेने शपथपूर्वक पूर्ण करीन.”
(शिवसेनाप्रमुखांनी १९९४ साली ही शपथ शिवसैनिकांना दिली होती. नाशिक येथाल गोल्फ मैदानावर शिवसेनेचे अधिवेशन झाले होते. या अधिवेशनातील ही शपथ आहे. लाखो शिवसैनिकांना खुद्द शिवसेनाप्रमुखांनी ही शपथ दिली आणि विशेष म्हणजे १९९५ साली महाराष्ट्रात सत्तांतर होऊन शिवसेना-भाजपचे सरकार आले. शिवशाही आणणार्‍या या प्रतिज्ञेला म्हणूनच ‘विजयी शपथ’ मानले जाते. ही प्रतिज्ञा चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली.)
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेली प्रतिज्ञा….
”मी प्रिय बाळासाहेबांना स्मरून,
प्रतिज्ञा करतो की,
महाराष्ट्राची प्रतिष्ठा आणि मराठी माणसाची अस्मिता यासाठी सदैव जागता राहीन.
शिवरायांच्या भगव्या झेंड्याची शान राखीन. त्याला कलंक लागेल असे कधीही वागणार नाही.
मी धगधगत्या निखार्‍यासारखा जगेन. माझ्यावर कधीही राख साचू देणार नाही.
प्रखर हिंदुत्वाची कास मी सोडणार नाही.
भारतमातेच्या सौभाग्याच्या रक्षणासाठी मराठी बाणा दाखवेन.
देशावर हिरवे संकट येऊ देणार नाही.
मी महाराष्ट्राच्या १०५ हुतात्म्यांना शब्द देऊन प्रतिज्ञा करतो की,
महाराष्ट्रातून मस्तवाल सत्ताधुंद कॉंगे्रसला सत्तेवरून खाली खेचेन. महाराष्ट्रात शिवशाहीचे राज्य आणेन.
गोरगरीब जनता, शेतकरी आणि माता-भगिनींच्या आयुष्यात सुखासमाधानाचे क्षण आणून शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करेन.”
जय हिंद! जय महाराष्ट्र!! वंदे मातरम्!!!
  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी

  • शिवसेना सोलापूर जिल्हा सभासद नोंदणी करा कल्याण-डोंबिवलीत आवाज शिवसेनेचाच!

    घडामोडी